
.. नांदगाव (प्रतिनिधी )- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे साहेब जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे -पाटील व उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंचावर श्री रमेश अण्णा बोरसे, विजय काकळीज,राजाराम गवांदे , शरद पगार ,शरद पाटील, राजेश पाटील ,सुनील बोरसे,दशरथ आरोटे, प्राचार्य जाधव, अविनाश सोळूंके ,प्राचार्य मढे, प्रतिभाताई खैरनार, ज्योती काळे, दीपक चव्हाण, अविनाश शेवाळे व सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.’खंडेल नवमी’ निमित्ताने विद्यालयातील संगीत साहित्य व पुस्तक यांचे पूजन करण्यात आले. काव्य लेखिका प्रतिभा खैरनार यांचा परिचय करून देताना विजय काकळीज म्हणाले की, आपल्या विद्यालयातील माजी विद्यार्थीनी असून,तू मृगजळ जणू, बाभूळ फुलं, पडसावल्या इ. काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. प्रतिभा खैरनार यांना इजि. अमित भाऊ बोरसे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रतिभा खैरनार यांनी आपले मनोगत व्यक्त करतात म्हणाले की, मी या विद्यालयातील माजी विद्यार्थीनी असून मला या शाळेचा ,संस्थेचा खूप अभिमान आहे, ‘बहुजन हिताय ,बहुजन सुखाय’ या ब्रीद वाक्य प्रमाणे ही शाळा ,संस्था शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करत असते. याप्रसंगी त्यांनी शिक्षकांप्रती आदर असलेली कविता वाचन देखील केले. अध्यक्षीय मनोगतातून इंजि. अमित भाऊ बोरसे -पाटील यांनी सर्वप्रथम कर्मवीर ॲड विठ्ठलराव हांडे साहेब यांचा जीवन कार्याचा परिचय करून देताना एका खेडेगावात जन्मलेल्या व्यक्ती परंतु समाजाप्रती सामाजिक व शैक्षणिक आस ठेवून त्यांनी आपली कार्याची सुरुवात केली.’भात लढा’ हि त्यांचा जीवनातील महत्त्वाची घटना आहे. संस्थेचे सभापती असताना त्यांनी संस्था कशी नावलौकिक होईल, या दृष्टीने प्रयत्नशील राहिले. काव्य लेखिका प्रतिभाताई खैरनार ह्यांच्या विषयी बोलताना,ताई विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आहेत याचा मला अभिमान आहे. प्रतिभाताईंच्या कार्याची प्रेरणा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमा अंतर्गत विद्यालयास तालुका स्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त झाल्याने त्यांनी विद्यालयातील सर्व सेवकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर व आभार प्रदर्शन दत्तात्रय भिलोरे यांनी केले.
