
नांदगाव (वार्ताहार )” जागर आदि शक्तीचा “शारोदत्सव निमित्त व्ही जे हायस्कुल नांदगाव शाळेत ललिता पंचमीच्या दिवशी विद्देची देवता माँ सरस्वती देवीची स्थापना करून ” “भोडंला ” साजरा करण्यात आला प्रसंगी पाटी पुजन करण्यात आले विधार्थिनींना आपले पारंपारिक सण उत्सव व निर्सग यांचे असलेले नाते या संदर्भात माहिती देवून भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून भोंडल्याची गाणी घेण्यात आली या गाण्यातून होणारा शारीरिक व भावनिक विकास कसा होतो याविषयी महत्व पटवून देण्यात आले इ ८ वी व ९वी च्या ‘ विद्यार्थिनी व माता पालक यांच्यासाठी आपली संस्कृती व आपण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले

विद्यालयाच्या संस्कृत विषय शिक्षिका सौ रुपाली झोडेकर यांनी आपल्या मनोगतातून आपले संस्काराची जपवणूक करणे हि काळाची गरज आहे स्त्रीयाचे अलंकार आपण ते कसे व कश्यासाठी वापरतो या विषयी आपला आहार विहार कसा असावा या विषयी अतिशय संस्कारक्षम व्याख्यान देवून भावी पिढि संस्कारक्षम व सुसंस्कृत कशी होइल या विषयी उत्तम मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री डॉ नांदूरकर सरांनी आपल्या प्रास्तविकातून शाळेत साजऱ्या होणाऱ्या संस्कारक्षम कार्यक्रमा विषयी माहिती दिली

कार्यक्रमासाठी मार्गदर्शक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल एन ठाकरे यांचे लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कीडा शिक्षिका श्रीम सुनीता देवरे श्रीम संगिता शिंदे श्रीम कल्पना जाधव श्रीम दिपाली सांगळे श्रील प्राजक्ता आहेर श्रीम शितल सोनवणे कु चैताली इंगळे व सर्व महिला शिक्षिकांचे सहकार्य लाभले !
