
बारागाव पिंप्री (प्रतिनिधी) | जिल्हा परिषद शाळा बारागाव पिंप्री येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सागर उगले तर उपाध्यक्षपदी संदीप जाधव यांची आज आयोजित पालक मेळाव्यात एकमताने निवड करण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक करून शाळा समितीच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या यांची माहिती दिली. शाळेतील गुणवत्तापूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक संधी याविषयी गोरक्ष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. पालकांनी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. मेळाव्यात इतर कमिट्यांच्या निवडणुका देखील पार पडल्या. सखी सावित्री कमिटीच्या उपाध्यक्षपदी वनिता जगताप, विद्यार्थी सुरक्षा कमिटीच्या उपाध्यक्षपदी सुदर्शन उगले, तर महिला तक्रार निवारण कमिटीच्या अध्यक्षपदी सरपंच संध्याताई कटके आणि उपाध्यक्षपदी संतोष कापसे यांची एकमताने निवड करण्यात आली. मेळाव्याचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. शेवटी जुन्या व नवीन समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामस्थ, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.—
