
मांडवड- (सिताराम पिंगळे):- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड येथे आज रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे थोर संस्थापक कर्मवीर ॲड.कै. विठ्ठलराव हांडे यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष प्रशांत आहेर हे होते.तसेच शालेय समिती सदस्य अजित आहेर,महेश मोहिते मुख्याध्यापक थेटे एस.जी.होते.समवेत पर्यवेक्षक महाले आर.एस. उपस्थित होते . प्रथमतः माननीय अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .त्यानंतर विद्यालयातील इयत्ता १० वी ब च्या विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे साहेब यांच्या जीवनकार्याची माहिती सर्व उपस्थितांना करून दिली. सातपुते यांनी ॲड.कै.विठ्ठलराव हांडे यांच्या कार्याची ओळख करू दिली.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक थेटे यांनी सांगितले की, ॲड.कै.विठ्ठलराव हांडे यांचे संस्था ते विधानपरिषद विरोधी नेते पद ,याविषयी ध्येयाने कर्मवीर हांडे साहेब यांनी कसे अविरतपणे बहुजन समाजाच्या विकासासाठी ,सर्वांपर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी श्रम घेतले हे सांगितले.शालेय समिती अध्यक्ष प्रशांत आहेर यांनी हांडे साहेबांच्या संस्थेतील काही आठवणी सांगितल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातपुते यांनी केले व आभार सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीम .चव्हाण (बोरसे) यांनी मानले . कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीने केले व सादरीकरण इयत्ता १० वी ब या वर्गाने केले.
