
नाशिक वार्ताहर- ( प्रतिनिधी ) शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नसून ते कर्मयोगी आहेत.युवकांच्या वर्तमान आणि भविष्यातील संस्कारांचा पाया आहेत.आजची पिढी जी तंत्रज्ञान आणि मोबाईल मध्ये व्यस्त झाली असून संस्कार विसरत चालली आहे. तिला घडवणं खूप मोठं काम असून ते काम शाळेची इतर सगळी काम सांभाळून शिक्षक करत आहेत. त्यामुळे शिक्षकाच्या या कार्याला आम्ही खरोखर नमन करतो. शिक्षकांच्या सक्रिय सहभागानेच राष्ट्राची पुनर्रचना होते.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून भारताची युवा पिढी घडविण्याचे शिक्षकांच्या कार्य मोलाचे आहे.म्हणून सर्व समाजाने शिक्षकांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला पाहिजे.असे प्रतिपदन् प्रसिद्ध उद्योगपती राजेश उपासनी ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेच्या राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून केले.ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी प्रास्ताविकातून संस्था परिचय करून दिला. चारुशीला लवाटे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुरस्कारार्थी परिचय अनिल भंडारे चारुशीला लवाटे यांनी करून दिला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे विशेष शिक्षक यांना मान्यवर उद्योजक राजेश उपासनी,व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक,जयश्री उपासनी,सेवानिवृत्त शिक्षिका कल्पना भामरे,उद्योजक पुंजाभाऊ सांगळे,लौकिक मांजरेकर,डॉ.सचिन हिरे,आणि संस्थेचे सल्लागार अजित कुलकर्णी राजाराम गायकवाड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन ” आदर्श शिक्षक ” पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यातील पुरस्कारार्थी अशोक शिरुडे मिलिंद टिळे, जयंत येवला यांनी मनोगत व्यक्त करून ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्था बद्दल कृतज्ञता व्यक्त केली प्राध्यापिका. वसुधा जोशी यांनी सूत्रसंचालन तर सचिव प्रदीप जगताप यांनी आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते संदीप पवार,संजय परदेशी,श्रीमती संगीता जाधव,अर्चना बोकेफोडे,ओमकार डावरे, किशोर शिरसाट व समाधान मोरे इत्यादींनी अमूल्य योगदान दिले. व संस्थेचे सर्व पदाधिकारी,शिक्षण क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. *सत्कारर्थी शिक्षक यादी* – रावसाहेब कांबळे,जीवनकुमार गोरे, भारती वराडे, संजय पाटील,दादासाहेब पाटील,अर्चना कोठावदे,स्नेहल अभ्यंकर,तन्वी महाडळकर,कांचन इप्पर, राजेंद्र खलोकर निर्झरा रामटेके,अनिल महल्ले,आशा आर्य,सविता खांदवे,स्मिता गजभिये,मनीषा बाहुले, संध्या थोरात,कमलाकर सोनवणे,राहुल गवळी,अनिता पाटील,नेहा बोडखे,वसंत विसपुते,दत्तात्रय महाले,सुनंदा साळुंके, नितीन पवार,भारती चौधरी,सुरेश गोरे श्रीमती सुनंदा नागरे,हिरामण शिंदे,अशोक शिरुडे,हेमंत पाटील,जयराम ससाने, संदीप निकम,प्रशांत पाटील,जयंत येवला,रजनी घाणे,मिलिंद टिळे, कैलास देसले,संध्या कुलकर्णी,ईश्वर चौरे, ताराचंद मेतकर, डॉ.सचिन हिरे,योगेश कुलकर्णी यांचा राज्यस्तरीय गौरव करण्यात आला.
