
अंदरसूल (प्रकाश साबरे),: सन्मान नवदुर्गांचानवरात्र उत्सवाची सांगता होत असून नाशिक जिल्यातील येवल्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोटमगांव येथे जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते.दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात,देवी भागवताची सांगता होत असतांना सायंकाळी दीपऊत्सवाचा कार्यक्रम झाला यावेळी ब्रह्माकुमारी येवला शाखेच्या संचालिका नीतादीदी व सहसंचालिका अनुदिदी यांच्या वतीने श्री जगदंबा माता ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन उत्तम सामाजिक कार्याचा गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष श्री रावसाहेब कोटमे, उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब आदमाने, सचिव श्री दिलीपराव कोटमे, विश्वस्त श्री अंबादास लहरे, तसेच श्री गणेश कोटमे व श्री लहानू धांद्रे व्यवस्थापक राजेंद्र कोटमे,पत्रकार राम कदम,श्रीमती सुबदा सुधीर दाणी,श्रीमती शैला जुगलकिशोर कलंत्री श्रीमती सुमनबाई वेणूनाथ कोटमे उपस्थित होते कोटमगावची जगदंबा माता त्रिगुणात्मक स्वरूप असलेली आहे. या शक्तिपीठांपैकी श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या तिन्ही स्थानांचे रूप येथे आहे. तीन फूट उंचीची प्रसन्न शेंदरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधते. तसेच, सप्तश्रुंगी, माहूर व तुळजापूर या तीन क्षेत्रांचा उगम स्थान म्हणून कोटमगावची देवी ओळखली जाते.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला शाखेच्या वतीने देखील कोटमगाव येथे विविध प्रकारच्या आध्यात्मिक सेवा दिल्या जातात.सातत्याने मागील वीस वर्षांपासून कोटमगाव देवस्थान ट्रस्ट येथे घटी बसणाऱ्या भावीक भक्तांसाठी निस्वार्थ रूपाने अध्यात्मिक सेवा देणाऱ्या राजयोगीनी ब्रह्माकुमारी नीतादीदी व राजयोगिनी ब्रह्माकुमारी अनुदीदी यांना देखील सन्मानित करण्यात आले… पत्रकार रामहरी कदम भाऊ यांनी आभार व्यक्त केले.
