
अंदरसूल येथील पुरातन नवसाला पावणारी तुळजाभवानी माता मंदिर
अंदरसूल (प्रकाश साबरे) येवला तालुक्यातील ऐतिहासिक अंदरसूल गावात नवसाला पावणारी जागृत जगदंबा देवी तुळजाभवानी मंदिर आहे अंदाजे 400 वर्षांपूर्वी गावाच्या दोन किलोमीटर अंतरावरील शेतात नांगरणी करताना शेतकऱ्यास जमिनीत शिवकालीन दगडी काळया पाषाणाची देवीची मूर्ती आढळून आली त्या शेतकऱ्याने गावातील आपल्या घराच्या जवळच मोकळ्या जागेत या मूर्तीची स्थापना केली तीनशे वर्षापूर्वी एक मंदिर बांधण्यात येऊन भाविकांनी श्रद्धेने पूजा सुरू केली कुंभार वाडा येथे या मंदिराचा ग्रामस्थ भाविक यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या हस्ते जीर्णोद्धार केला आज मंदिराच्या परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आली या तुळजाभवानी मंदिरात नेहमी स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने दर्गा सप्तशती पाठाचे वाचन शेकडो महिला करीत असतात शेकडो वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो व या उत्सवात शेकडो वर्षापासून मराठवाड्यातून परभणी जल्ह्यातून एके काळी आकाशवाणी केंद्रात देवीचा गोंधळ केलेल्या गोंधळाची तिसरी पिढी दरवर्षी गोंधळ घालण्यासाठी येत असतात दररोज पाठ गोंधळ होत असतो अंदरसूल व परिसरातून शेकडो भाविक या तुळजाभवानीला साकडे घालून नवस बोलत असतात भाविकांची मनोकामना इच्छा ही देवी पूर्ण करते अशी गाढ श्रद्धा आहे

अंदरसूल येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मातेच्या मंदिरात अंदाजे शंभर वर्षापासून परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध आकाशवाणी केंद्रात देवीचा गोंधळ केलेल्या गोंधळाची तिसरी पिढी दरवर्षी येऊन दहा दिवस गोंधळ घालत असतात

अंदरसूल येथील कुंभारवाडा जागृत नवसाला पावणारी तुळजाभवानी मंदिर
