
प्रसिद्ध कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिर.
अंदरसूल (प्रकाश साबरे) : नवरात्र उत्सव सुरु झाला असून नाशिक जिल्यातील येवल्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोटमगांव येथे जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते आहे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष श्री रावसाहेब कोटमे, उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब आदमने, सचिव श्री दिलीपराव कोटमे, विश्वस्त श्री अंबादास लहरे, तसेच श्री गणेश कोटमे व श्री लहानू धांद्रे राजेंद्र कोटमे उपस्थित राहून मार्गदर्शन करतात.चोख पोलिस बंदोबस्त ४० सी सी टीवी कॅमेरे सर्वत्र वॉच ठेऊन असतात १०० च्या वरती कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात भाविकांना लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे कोटमगावची जगदंबा माता त्रिगुणात्मक स्वरूप असलेली आहे. या शक्तिपीठांपैकी श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या तिन्ही स्थानांचे रूप येथे आहे. तीन फूट उंचीची प्रसन्न शेंदरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधते. तसेच, सप्तश्रुंगी, माहूर व तुळजापूर या तीन क्षेत्रांचा उगम स्थान म्हणून कोटमगावची देवी ओळखली जाते.कोटमगावमध्ये दर्शनासाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, बुलढाणा जिल्हा तसेच गुजरातमधून भाविक येतात. दररोज सुमारे २,००० भाविक घटी बसतात, आणि सुव्यवस्थित भक्त निवासामुळे त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे घटी बसलेल्या भाविकासाठी दररोज अन्नदान सुरू असते सांकृतिक कार्यक्रम कीर्तन भजन जागरण गोंधळ सुरूच असत
कोटमगाव येथे अंदाजे चाळीस वर्षांपासून येवला येथील येवला तालुका भूषण जेष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके सर यांच्या नेतृत्वाखाली धडपड मंच च्या वतीने मोफत चरण सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे
