
अंदरसूल (प्रकाश साबरे). अंदरसूल येथील कोळगंगा नदीला महापूर आल्याने नदीकाठावरी घरकुले वाड्या वस्तीवरील घरामध्ये व शेतात पुराच्या पाण्याचा तसेच सततधार मुसळधार पावसाने अतोनात नुकसान झाले असून काल संध्याकाळी सहा वेळेपासून अंदरसूल सायगाव पांजरवाडी धामणगाव बोकाटे देवळाने कोळगंगा नदीपात्रलगत असलेल्या सर्व गावात घरांची पडझड तसेच अंदरसूल येथील कोळगंगा नदीपात्रलगत असलेल्या घरकुलांच्या मध्ये पाणी गेल्याने सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत पहाटे चार वाजेपासून गावातील तरुण तसेच शासनाचे प्रतिनिधी यांनी त्वरित भेट देऊन बाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची आवश्यक व्यवस्था केली

त्याच प्रमाणे ना छगनराव भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे नायब तहसीलदार पोलिस निरीक्षक मंडलिक व सर्व पोलीस कर्मचारी पहाटे पासून या परिसरात पोहोचले होते दिलीप खैरे व सर्व पदाधिकारी यांनी पाहणी केली ना छगनराव भुजबळ साहेब यांनी अंदरसूल येथील सर्व बाधित घरकुलांच्या नागरिकांच्या पूर पाण्यात उतरून भेटी घेऊन त्यांना धीर देऊन तत्काळ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले तत्काळ शासकीय मदतीचे आदेश दिले अंदरसूल येथील कोळगंगा नदीपात्रलगत असलेल्या वैजापूर वेश लोकनेते विलासराव देशमुख प्रवेशव्दार कमानवेस या परिसरातील रामेश्वर मंदिर तसेच टेकेश्वर मंदिर शनी मंदिर या सर्व गावाच्या चहु बाजूने पूर पाण्याने वेढा घातला तसेच पांजरवाडी जवळील गवळी वस्तीवरील घरामध्ये पाणी गेल्याने तेथील शेतकरी कुटुंबाला परिसरातील युवा कार्यकर्ते व शासकीय यंत्रणेचे कर्मचारी यांनी सुरक्षित ठिकाणी नेण्याची आवश्यक व्यवस्था केली अंदरसूल गावातील बाधित कुटुंबांना राममंदिर येथे हलविण्यात आले

अंदरसूल येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करताना खा भगरे ॲड माणिकराव शिंदे विठ्ठलराव शेलार आदी

अंदरसूल येथील कोळगंगा नदी रामेश्वर मंदिर 28 सप्टेंबर 2025

टेकेश्वर मंदिर शनिश्वर मंदिर परिसर अंदरसूल

कोळगंगा नदी व लेंडी नाला नदी या दोन्ही बाजूने पूर पाणी आल्याने नदीने पाण्याची पातळी वाढली होती थोडक्यात 50 वर्षानंतर महापुराने रौद्ररूप धारण केले आहे
