
निगडोळ (प्रतिनिधी )आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या मा.श्री.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या सुंदर वनराईने नटलेल्या,ज्ञानसंपदेने सजलेल्या व आदिवासी दुर्गम भागात डोंगरदऱ्यात वसलेल्या निगडोळ केंद्रातील सर्वांगसुंदर विद्यालयास आज मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा हे पारितोषिक देऊन प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.महाराष्ट्राचे अन्न आणि औषधप्रशासन,विशेष सहाय्य मंत्री मा.ना.श्री.नरहरी सिताराम झिरवाळ साहेब यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक मी व माझ्या शिक्षक सहकाऱ्यांनी स्वीकारले.मा.खासदार श्री.भास्कर मुरलीधर भगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या व्ही.एन.नाईक कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी या कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत सोमवार दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.मा.श्री.ओमकार पवार साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक,मा.श्री.हिरामण तुकाराम झिरवाळ साहेब उपजिल्हाधिकारी,शिक्षणाधिकारी मा.श्री.भास्कर कनोज साहेब,गटशिक्षणाधिकारी श्री.सी.बी. गवळी साहेब,गटविकास अधिकारी मा.श्री.भास्कर रेंगडे साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.कैलास पगार साहेब,केंद्रप्रमुख मा.श्री.नितीन बागुल साहेब व शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मुख्याध्यापक म्हणून स्वीकारतांना मनस्वी आनंद झाला.माझ्यासोबत उपस्थित असलेल्या व सदैव विद्यालयाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असणारे ज्येष्ठ शिक्षक श्री.नितिन कापडणीस,सुभाष बेद्रे श्री.अमोल वाघमारे व रयत सेवक श्री.तुळशीदास भामरे या माझ्या कर्तव्यपरायण रयत सहकाऱ्यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे.
