
नांदगाव ( गणतंत्र न्यूज) आ.सुहास कांदे यांनी नांदगाव तालुक्यात अतिवृष्टी मुळे पिकांची झालेल्या नुकसानीची पाहाणी केली. अतिवृष्टी मुळे तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी पुन्हा आसमानी संकटात सापडला आहे.आ.सुहास कांदे यांनी पाहाणी करतांना त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत म्हणाले की, खचून जाऊ नका सरकार आपल्या पाठीशी आहे

असे सांगत नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नांदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा मका भुईमूग कपाशी आधी सह फळबाग व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तालुक्यातील साकोरे, तळवाडे ,वेहळगाव ,कळमदरी, मळगाव, बोराळे ,आमोदे ,पळाशी, सावरगाव ,न्यायडोंगरी आदी गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या नुकसान झालेला मी कधी शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधितांनी लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले

पाहणी दौऱ्यात तहसीलदार सुनील सौंदाणे, माजी आमदार संजय पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण खताळे, बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, माझी सभापती विलास आहेर, तेज कवडे, रमेश बोरसे, राजेंद्र पवार, विठ्ठल पगार,प्रशांत पगार, ज्ञानेश्वर निकम, उज्वल सोळंके,आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.
