
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४४ वा दिवस*
तुमच्या सौभाग्याने तुम्हाला संधी मिळाल्यास ईश्वराच्या संतानांची सेवा करा. प्रभूच्या इच्छेने तुम्ही त्याच्या एखाद्या संतानांची सेवा करू शकला तर तुम्ही स्वतःला धन्य माना; तुम्ही स्वतःला मोठे समजू नका. सेवेची संधी इतरांना न मिळता तुम्हाला मिळाली याबद्दल स्वतःला भाग्यवान समजा. या जगात गरीब व दुःखी लोक हे आपल्या मुक्तीसाठीच आहेत. रोगी, पिडीत, असह्य, कष्टी, दरिद्री, गरजू यांच्या रूपाने आपल्यासमोर येणाऱ्या प्रभूची सेवा आपल्याला करता यावी यासाठीच दुःखी लोक या जगात आहेत.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ८ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५
★ दुर्गाष्टमी, सरस्वती पूजन
★ १९९३ अनंत चतुर्दशीच्या दिवशी खिल्लारी, लातूर येथे झालेल्या भूकंपात दहा हजाराहून अधिक लोक ठार झालेत तर हजारो लोक बेघर झालेत.
★ २००१ माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते, ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशात विमान अपघातात निधन, स्मृतिदिन
.★ आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन.
