
सिन्नर ( प्रतिनिधी ) २९ सप्टेंबर २०२५ हमीद दलवाई यांच्या ९३वी जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले* या कार्यक्रमाची सुरुवात हमीद दलवाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाज विचारसणीवर परभावि होऊन हमीद दलवाई यांनी आपले मुस्लिम समाजाच्या परिवर्तनासाठी आपले सर्वस्व झोकून दिले,

विशेषतः महिलांच्या हक्कांसाठी. ज्यावेळी समाजामध्ये पराकोटीची जुनाट विचारसरणी आणि टोकाचा धर्मांधपणा होता त्यावेळी ट्रिपल तलाक विरोधातही त्यांनी लढा दिला. समाज परिवर्तनाच्या विचारांचा प्रभाव राहण्यासाठी त्यांनी २२ मार्च १९७० साली ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ ‘ स्थापन केले. अन्याय झालेल्या अनेक मुस्लिम महिलांना त्यांनी आधार दिला. मुस्लिमांनी शिक्षण घ्यावे हा त्यांचा आग्रह होता. पुढे त्यांनी ‘मुस्लिम सेक्युलर सोसायटी’ ची स्थापना केली. अल्पशिक्षित असूनही त्यांना वाचनाची विलक्षण आवड होती. मराठी साहित्याला लाभलेले ते एक अनमोल ‘साहित्यकार’ होते. त्यांनी इंधन, लाट सारखी पुस्तके लिहली. तसेच त्यांनी भारतातील मुस्लिम राजकारण यावरही लिहले. समाजपरिवर्तनासाठी त्यांनी बरेचसे लिखाण केले.मराठी भाषेवर असामान्य प्रभुत्व, अत्याधुनिक विचारसरणी आणि तिचा पाठपुरावा करून आपल्या समाजाला व देशाला सुधारण्याची आत्यंतिक तळमळ हमीद दलवाईंनी समाजाच्या परिवर्तनासाठी आपल्या ४४ वर्षाच्या अल्पायुष्यात पत्रकार, लेखक अशा नानाविध भूमिका सहज पेलल्या. त्यांच्या विचारांची कास धरून समाज परिवर्तनासाठी झगडणारे अशे अनेक अनुयायी त्यांना भेटले. त्यांचे वारसदार त्यांची प्रेरणा घेऊन लढत होतेअशा निर्भय व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*या कार्यक्रमाचे सुञसंचलन रुपेश मुठे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे केले तर आभार गणेश पाटिल यांनी मानले* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे मार्गदर्शक निवृत्ती भांगरे , सहसंस्थापक विजय मुठे माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे,गणेश पाटिल लखन पाचोरे, दिलीप गाडेकर ( पैलवान) जगन्नाथ डावरे, सोपानः लोणारे मांडीवाले, राहुल माळी,विशाल भालेराव, रोहित मुठे,किरण मुठे आदि.उपस्थित होते
