
सिन्नर (प्रतिनिधी) – शिक्षकनेते अंबादासजी वाजे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, सिन्नर यांच्या वतीने शिक्षक नेते अंबादासजी वाजे स्मृती दिनानिमित्त सन 2025–26 या वर्षाचा ‘शिक्षकरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विजय बागुल होते. चेअरमन प्रदीप शिंदे, व्हा. चेअरमन रेणुका गोराडे, मानद सचिव भास्कर सदगीर यांच्यासह संचालक गोरक्ष सोनवणे, महेश गायकवाड, बाळासाहेब चव्हाणके, कैलास पवार, मोतीराम इलग ,अंकुश सहाणे,दिपक बागुल ललिता वाजे आदींसह संगठना पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी विजय बागुल यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षकांच्या कार्यकौशल्यामुळे शक्य होत असल्याचे सांगत योग्य शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षकरत्न पुरस्कार 2025 प्रदान शिक्षक राजेंद्र आंबेकर (जि.प. गुळवंच बीट, सिन्नर), राजेंद्र आहेर (जि.प. सोनारी बीट, पांढुली), अशोक जाधव (जि.प. मेंढी बीट, वडागळी), कैलास पवार (जि.प. पाटोळे बीट, डुबेरे), ज्ञानेश्वर दिघे (जि.प. पिंपरवाडी बीट, वावी) आणि साईन बानो सय्यद (जि.प. नायगाव बीट, ब्राम्हणवाडे) जीवन गौरव पुरस्कार 2025 माजी मुख्याध्यापक कै. दशरथ दामोधर शेजवळ (जि.प. कुंदेवाडी) यांना मरणोत्तर प्रदान शिक्षक मित्र सोमनाथ तेल्हूरे स्मृती दिनानिमित्त आदर्श शाळा पुरस्कार 2025 अंतर्गत जि.प. शाळा पांगरी बु. या शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान तसेच गुणवंत विद्यार्थी आणि तसेच विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविलेल्या शिक्षकांचा आणि मुख्याध्यापक पदी निवड झालेल्या शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन् संजय
ननावरे यांनी तर आभार कैलास पवार यांनी मानले
