
सिन्नर (प्रतिनिधी) – शिक्षक नेते अंबादासजी वाजे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रदीप शिंदे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी विजय बागुल उपस्थित होते शिंदे यांनी आपल्याप्रास्ताविकातून पतसंस्थेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. वार्षिक अहवालाचे वाचन व्यवस्थापक श्री. दीपक खुळे यांनी केले. सभेत शेअर्स व डिव्हिडंडवरील व्याजवाटप समान ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला

तसेच कर्जव्याजदर 8 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सभासदाच्या विविध प्रश्नांचे समाधान करण्यात आलेयावेळी व्हा. चेअरमन सौ. रेणुका गोराडे, मानद सचिव श्री. भास्कर सदगीर यांच्यासह संचालक मंडळातील महेश गायकवाड, गोरक्ष सोनवणे,कैलास पवार बाळासाहेब चव्हाणके,अंकुश सहाणे, सुरेश गोसावी, दिपक बागुल, मोतिकाका इलग, सौ. ललिता वाजे, सौ. रंजना भालेराव, सौ. जिजाबाई धिंदले व सौ. शोभा म्हस्के यासह संगठनेचे पदाधिकारी आनंदा कांदळकर, संजय भोर ,अशोक कासार आदी मान्यवर उपस्थित होते

.सभेस सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि वार्षिक सभेचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
