
आसन व्यवस्था

साकोरा (प्रतिनिधी). बुधवार दि. 24/09/2025 पासून ते शनिवार दि. 27/09/2025 पर्यंत शासकिय रेखाकला परीक्षा साकोरे येथील पेडकाई माता विद्यालयात सकाळी 10.00 ते 4.00 यावेळेत होणार आहे. अशी माहिती केंद्र संचालक103038 साकोरा केंद्र मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी संबंधित चित्रकला सप्टेंबर 2025 साठी बसलेल्या परीक्षार्थीना सुचित केले आहे. व मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका व सर्व कला शिक्षक नांदगाव तालुका यांना सुचना आहे आपण परीक्षेला विद्यार्थी ज्या गाङी मधून आणणार किंवा पाठवणार आहे त्या फोरविलर गाङ्या विद्यालयाच्या शेजारी असलेल्या कासलीवाल नगरी येथे कोणालाही अङचण होणार नाही अशी उभी करावी किंवा ज्यांना बाहेर कुठे उभी करायची तो निर्णय त्यांंचा असेल फोरविलर ही वाहने शालेय आवारात आणू नये. फक्त मोटरसायकल मध्ये आणून एका रांगेत लावावी हे सर्व या करिता बाहेर रसत्याचे काम सुरु आहे. आवारात विद्यार्थी बसायला , फिरायला जागा हवी. अर्धे मैदान वर चिखल आहे. तसेच शालेय आवारात स्वच्छता राखीव ह्या सर्व सुचना प्रत्येकांने विद्यार्थाना तुमच्या शाळेत द्याव्यात. तसेच शाळेतील आतील व बाहेरील आवार संपूर्ण CCTV कक्षेत आहेत. विद्यालयात फक्त पर्यवेक्षक त्यांना च प्रवेश असेल कोणीही विनाकारण गर्दी करु नये. कलाशिक्षक यांनी शेजारच्या कासलीवाल नगरीत किंवा तुमच्या सोयीने बसावे विद्यालय आवार सोङून. तुमच्या सहकार्या शिवाय परीक्षा पार पाङता येणार नाही म्हणून सहकार्या करावे हीच विनंती राहिल . वर आसन व्यवस्था दिली आहे.
*आपला* ——- केंद्रसंचालक 103038 शासकीय रेखाकला परीक्षा साकोरे ता नांदगाव जि नाशिक
