
नांदगाव ! रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणीजनांचा “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी नाशिक येथील रोटरी क्लब, गंजमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, कला आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर गुणीजनांनी आपले प्रस्ताव रिपब्लिक वार्ता महाराष्ट्रचे मुख्य संपादक डॉ. अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद व नाशिक /नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांच्याकडे दिनांक 5 ऑक्टोबर 2025 पर्यंत पाठवावेत. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादरी करणासाठी मोबाईल नंबर 7798589680 / 8605682015 /7263819977/9168406283 या नंबर वर संपर्क साधावा
