
नाशिक (प्रतिनिधी) :शास्त्रीय स्वरांची भाषा,स्वर ताल दिव्य प्रेरणेने ,आतल्या जाणिवेने आत्मसात करून कलेतले सामर्थ्य रसिकांसमोर सादर केले आणि रसिकांना अनोखी अनुभूती दिली.नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. *डॉ आशिष रानडे यांचे शिष्य ,केदार कुलकर्णी* चे शास्त्रीय गायन संपन्न झाले.रसिक कुलकर्णी (तबला), अथर्व भागवत(संवादिनी) नामिश सांगळे(तानपुरा)यांची त्यांना साथसंगत लाभली.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.स्मिता मालपुरे यांनी केले.जिद्द आणि कलेची आस यांतून प्रतिभावंत कलाकारांचा जन्म होतो आणि ते समाजासाठी भूषण असते याची प्रचिती केदारच्या कलाप्रवासाकडे पाहून येते त्याची प्रचिती रसिकांना आली.मैफिलीचे हे 54 वें पुष्प होतेकेदारने मैफिळीची सुरुवातराग बैरागी भैरव ने केली त्यानंतरराग तोडी सादर केला त्यानंतर राग भैरवी जय दुर्गे दुर्गती परिहारिणी हे गीतातून अध्यात्मिक अनुभूती दिली.कलावंत व मान्यवरांचे सन्मान, डॉ विनायक गोविलकर, विजया मालपुरे,विलास पाटणकर,स्मिता जोगळेकर,संजय कंक,विनायक रानडे,रविकांत कुलकर्णी ह्यांचे हस्ते करण्यात आले.तसेच गायक ,पं मकरंद हिंगणे,सतार वादक प्रतिक पंडित यांनाही सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. विश्वास हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.. जिद्द आणि कलेची आस यांतून प्रतिभावंत कलाकारांचा जन्म होतो आणि ते समाजासाठी भूषण असते याची प्रचिती केदारच्या कलाप्रवासाकडे पाहून येते.सदर कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर व विश्वास टर्फ यांचे सहकार्य लाभले आहे.
