
ओझर: दि.२१ वार्ताहर उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात साक्षरता परीक्षा घेण्यात आली. यात ३० निरक्षर व्यक्ती साक्षर परीक्षेस प्रविष्ट झाले. यावेळी परीक्षा केंद्रास बोरसे के एम विस्ताराधिकारी शिक्षण विभाग निफाड यांनी भेट दिली असता परीक्षा सुरळीत पार पडल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ओझरचे केंद्रप्रमुख गोसावी सर, मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे केंद्र संचालक प्रभाकर लवांड यांनी परीक्षा कामकाज पाहिले. पर्यवेक्षक म्हणून विशाल पगारे यांनी काम पाहिले. याप्रसंगी मंगल सावंत मेघा शेजवळ संगीता शेटे संगीता भदाणे संगीता सोनवणे मोनाली निकम शितल आहेर मोहिनी चौधरी मनोरमा सोमवंशी लता आहेर मोहन क्षीरसागर यश बोरसे कनिष्ठ लिपिक श्रीमती गुरुळे पुंडलिक जाधव यांनी परीक्षा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
