
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय परिवहन समितीची(सन 25-26) सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्राचार्य संजय डेर्ले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

मखमलाबाद विद्यालयात शालेय परिवहन समितीच्या सहविचार सभेस उपस्थित सर्व मान्यवर
.या प्रसंगी व्यासपिठावर आर.टी.ओ. अधिकारी (वाहतूक विभाग) वैभव डुबेवार, म्हसरूळ पोलिस स्टेशनचे अधिकारी मिना पवार,महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना या संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अजिमभाई सय्यद, प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्य रावसाहेब उशिर,पर्यवेक्षक संजय हांडगे,जेष्ठ शिक्षक अनिल पगार आदी मान्यवर उपस्थित होते.प्रथम उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.*

*प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविकात या सहविचार सभेचा उद्देश विषद करतांना ते म्हणाले की मविप्र संस्थेचे नाशिक ग्रामीण चे संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या निर्देशानुसार वाहनातून येतांना-जातांना विद्यार्थ्यांची सुरक्षितता अती महत्वाची आहे.त्यासाठी वाहन मालक व चालक,आर.टी.ओ. चे अधिकारी,पोलीस स्टेशनचे अधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती व विद्यार्थी याचा समन्वय साधावा या उदात्त हेतूने या सहविचार सभेचे आयोजन केले गेले.* *आरटीओ अधिकारी वैभव डुबेवार यांनी वाहतुकीची नियमावली,गाडी चालकांचे-मालकांचे व प्रवासी विद्यार्थ्यांचे कर्तव्य तसेच जबाबदाऱ्या समजुन सांगीतल्या.म्हसरूळ पोलिस स्टेशनचे अधिकारी मिना पवार यांनी प्रवासात विद्यार्थी वा विद्यार्थीनींना समाज कंटकांकडून असुरक्षितता जाणवल्यास निर्भया पथकाची माहीती व कर्तव्य सांगून त्यांच्याशी कसा संपर्क साधावा यावर सविस्तर विवेचन केले.ज्येष्ठ शिक्षक पगार सर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक संजय हांडगे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख अनिल पगार,समिती सदस्य सोमेश्वर मुळाने,अशोक गावले,दयाराम मुठाळ,शरद आहेर, सुनिता उशीर यांनी केले.कार्यक्रमास मखमलाबाद विद्यार्थी वाहतूक सेनेचे विभाग प्रमुख सनी मानकर,या सेनेचे मखमलाबाद शाळेचे अध्यक्ष राजाभाऊ शेकडे,उपआध्यक्ष कृष्णा म्हैसधूने,पेठरोड विभाग प्रमुख अशिष पटेल तसेच सर्व वाहन मालक व चालक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
