
नांदगाव ( प्रतिनिधी) शिक्षक नेते स्व. अण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. नांदगाव यांच्यावतीने *सौ.अंजुमताई सुहास कांदे* यांना महिला सक्षमीकरण, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल *”नांदगाव रत्न”* पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नांदगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे उपस्थित होते. या वेळी बोलतांना सौ.अंजुम ताई कांदे यांनी संस्थेचे आभार मानत दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे मत व्यक्त केले.
