परिक्षण:- राजू गरमडे , चंद्रपूर

सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका प्रतिभा सुरेश खैरनार [ मु.नांदगाव..जि.नाशिक ] ताईचा वंशावळीच्या प्राचीन सरीतून… हा परिस पब्लिकेशन ने प्रकाशित केलेला कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला.सोशलमिडीयावर या कवितासंग्रहाविषयी अनेक रसिक वाचकांनी ‘ कवितासंग्रह चांगला आणि वाचनीय आहे ‘ हा अभिप्राय वाचून मी ताईकडून हा कवितासंग्रह मागवून घेतला आणि ताईच्या आईवडीलांनी ठेवलेले ‘ प्रतिभा ‘ हे नाव ताईनी सार्थक करुन दाखविले हे त्यांच्या कविता वाचल्यानंतर वाचकांना कळणार आहे.कवितासंग्रहाची अर्पण पत्रिका वाचली की,कवयित्रीच्या कविता वाचण्यासाठी मन उत्सुक होऊन जाते.’ बाईपणाचा हिरवा गर्भ ठेवणार्याओसाड पुरुषी माळरानालाअन् काळाच्या पाठीवर अख्खा जन्मसहनशीलतेने सारवून – लिंपूनजगण्याचा पापुद्रा धरुन आलेल्याबाई कुळाला…..’तसेच मनोगतामध्ये आलेल्या…” ओटीपोटावरच्या कोरीव लेण्यांमध्ये घुमणार्या घरंदाज हुंदक्याचे आर्त स्वर..…’या ओळी मध्ये सौंदर्यामध्ये स्त्री च्या वेदनेचे भाव दडलेले आहे अशा आशयाच्या या ओळी कवितेविषयी भाष्य करणारे आहेत.’ स्त्री ‘ विश्वाची जननी आहे.तिच्याच गर्भातून अवघ्या सृष्टीची निर्मिती होत असते.एक प्रकारे तिला नियतीने मातृत्वाच वरदान दिलेले असल तरी तिच्या नशिबी मात्र अनेक दुःखाचे,वेदनेचे डोंगर उभे करुन ठेवलेले आहे.ती आपल्याला कधी आईच्या,बहिणीच्या,पत्नीच्या,लेकीच्या तर कधी मैत्रीणीच्या रुपात ती आपल्या आयुष्यात येत असते. आपल्या समाजामध्ये स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकोनच ‘ चूल आणि मूल ‘ यांच्या परिघातच असतो.आजही फार फरक पडला अस वाटत नाही.ती कमावती असली तरी किती स्त्रियांना आपला पगार स्वतंत्रपणे खर्च करण्याचा अधिकार असतो.ती सक्षम आहे.ती कुटुंबाचा आधार बनू शकते.अस किती जणांना वाटतं.म्हणूनच,तीची वाटचाल ही पुरुषी अहंकाराच्या वर्चस्वातून झालेली आहे.तिच स्वतंत्र असणच अनेकाना पटत नाही.वेदनेचे,दुःखाचे,अपमानाचे शल्य सोबत घेऊनच ती जगत आलेली आहे.म्हणूनच,कवयित्रीने आपल्या प्रत्येक कवितेमधून स्त्रीच दुःख,तिची वेदना,तिची तगमग,तिची घुसमट,तिची अगतिकता तितक्याच दमदारपणे मांडलेली आहे. ताईची कविता मनाचा ठाव घेणारी आहे. त्यांच्या काही कवितेवर लिहिण्याचा मोह मी आवरु शकत नाही
.लपवते बाई जशीपापणीच्या आड दुःखाच्या वास्तवालातशी दडपून ठेवते चूलतिच्या निर्विकार राखेखालीपेट घेऊ पाहणार्या विस्तवाला”
बाई आणि चूल ” या कवितेमधील ही रचना बाईच चुलीशी असलेल नात अधोरेखित करणारी आहे.पूर्वीपासून तिला ‘ चूल आणि मूल ‘ हेच तिच कार्यक्षेत्र आहे हे तिच्या मनावर बिंबवण्याचा प्रयन्न पुरुषसत्ताक असलेल्या समाजव्यवस्थेने केलेला आहे.राखेच्या आत विस्तव असतो पण राखेमुळे तो आपल्याला दिसत नाही.अगदी त्याचप्रकारे,तिच्याही आयुष्यावर दुःखाचे आणि वेदनेचे गडद ढग भिरभिरत राहतात हेच या कवितेमधून कवयित्रीला सुचवायचे आहे.तिने कोणत्याही फेअरनेस क्रीमपेक्षाआनंदाचा कर्तृत्वाचा लेप जगण्यावरलावला असतातर आला असता जगण्यातदिवसेंदिवस खरा एचडी ग्लोपुरुषांनानावीन्याचा ध्यास असतोच गंपण तुझी धडपड फक्तसौदर्य टिकवून ठेवण्या करताचअसावी का ?कवयित्रीची ही कविता या संग्रहातील लक्षवेधी कविता आहे.” मेक ओव्हर ‘ या कवितेमधून कवयित्रीने अवघ्या स्त्री शक्तीलाच हा प्रश्न विचारलेला आहे.नियतीने तुम्हाला सक्षम बनविलेले आहे.शून्यातून विश्व तुम्ही निर्माण करणार्या.स्वतःच्या शक्तीचा,बुद्धीचा,कल्पकतेचा उपयोग करुन स्व:विकासासाठी न करता तुम्ही सौदर्य टिकवून ठेवण्यामध्येच स्वतःला धन्य मानता.लक्षात ठेवा,’ बाह्य सौंदर्य हे काळानुसार नष्ट होत असते.पण,मनाच अभिजात आंतरिक सौंदर्य हे शाश्वत असते.आपल्या क्षमता ओळखून,शिक्षणाची कास पकडून तुम्ही यशस्वी बनू शकता. तेव्हा पुरुषी अहंकारासमोर तुम्हाला नमतं घेण्याचा प्रश्नच उरणार नाही. स्त्रीच्या शक्तीलाच जागविणारी ही कविता आहे.पुरुषी वासनेचाअख्खा समुद्रगिळंकृत करूनहीतीतहानलेली असतेथेंब भर प्रेमासाठीआयुष्यभरनिसर्गाने बहाल केलेली प्रत्येकच गोष्ट आपल्यासाठी आवश्यकच असते.फक्त तिचा अतिरेक होता कामा नये.प्रेम आणि वासना या भावना नियतीने आपल्याला दिलेल्या आहेत.फक्त या दोन्होमधील फरक आपल्याला कळला पाहिजे.तिला सर्व सुखे मिळाली तरी ती स्त्री प्रेमाशिवाय अपूर्णच असते.प्रेमच तिच्या आयुष्याला पुर्णत्व बहाल करीत असते हे ” तहान ” या कवितेमधून कवयित्रीनी सुंदरपणे मांडलेले आहे.
काळाच्या रेघांनीजोडत जातेहरेक स्वप्नांचे बिंदूप्रयन्नांचे रंगीबेरंगी रंग भरतेआशेच्या नक्षीवर स्त्री ही घराच हसर अंगण आहे, देव्हार्यातली लुकलुकणारी पणती आहे असं म्हणतात ते काही खोट नाही.मनातल्या भावनांना,इच्छांनां मूर्त रुप देत ती आपल्या आयुष्याची वाटचाल करत असते. रांगोळीमध्ये रंग भरले की,ती जशी सुंदर दिसते तशीच स्त्री सुद्धा आपल्या आशेच्या किरणानी आपल्याही आयुष्याला सुंदर बनवित असते.” टिंबाची रांगोळी ” या कवितेमधील ही रचना स्त्रीच्या सौंदर्याच,प्रयन्नाच,इच्छाशक्तीच सुंदर अस भावरुपच आहे.बाई गिरवत आलीयपिढ्यानपिढ्याबाईपणाच्या ओळीबाई नावाची शाई संपेपर्यंतब बळीचा की ब बाईचा ?बाई ही जणू दुःख भोगण्यासाठीच आणि सृष्टीच सृजन घडवून आणण्यासाठीच जन्माला आली की काय अस तिच्या आयुष्याकडे पाहून वाटत.वेदनेचा शाप आणि सृष्टीच्या निर्मितीचा उ:शाप देऊन नियतीने तिच दुःख काही प्रमाणात कमी केलेल आहे.ब बळीचा की ब बाईचा हा प्रश्न ” ब बाईचा ” या कवितेमधून कवयित्रीने विचारुन तिच्या आयुष्यालाच उलगडलेल आहे.जरा कुठे तिला वेळ झाला कीसैरभैर होतो जीवतेव्हा कळतंकावळा घिरट्या घालतअसतानाझाडावरच्या घरट्यातीलचिमणीची तडफड….” तडफड ” या कवितेमधून एका आईच्या आपल्या लेकीप्रती असलेल्या असुरक्षित भावनेचे भाव व्यक्त झालेले आहेत.विकृत वासनांध कधी घात करेल सांगता येत नाही आणि त्यांना ओळखता येत नाही.अशांच्या तावडीत आपली लेक तर सापडणार नाही ना ही भीती आज प्रत्येक आईच्या मनाला लागून राहिलेली आहे.तुझ्यामुळेच साऊआयुष्याच्या कोर्या कागदावररेखाटू शकलेअस्तित्वाच्याआखीव रेखीवसुरेख रेघोट्या” तुझ्यामुळेच साऊ ” या कवितेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आहे.तुझ्यामुळेच हे ज्ञानाचे दरवाजे आमच्यासाठी खुले झाले आणि म्हणूनच घराचा उंबरठा ओंलाडू शकतो.आमच अस्तित्व आम्ही निर्माण करु शकलो फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच साऊ.या कवितासंग्रहातील इतरही कविता वाचनीय आणि लक्षवेधी आहे. स्त्रीच भावविश्व उलगडणार्या काही कवितांचा प्रातिनिधीक स्वरुपात उल्लेख करावयाचा झाल्यास..सोन्याचा मुकूट….गुंजा….मुली….पितळी घंटा….बाईच्या आतली बाई….कविता….किंकाळ्या….विहिरीवर गेलेली बाई….मुंग्या अन् मुली….पाळी अन् बाई….घरंदाज हुंदके…आयुष्याचा पसारा….” यासारख्या कवितांचा करता येईल.कवितासंग्रहावरच मुखपृष्ठ खुप काही सांगून जाणार आहे.दुर्गेश सोनार सरांची प्रस्तावना वाचकांना कवितेकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देऊन जाते.सरांनी उलगडलेल्या कविता वाचकांच्या मनात कवितासंग्रहाविषयी ऊत्कंठा निर्माण करुन जाते.’ पुरुषी माळरानावर बाईपणाचा हिरवा गर्भ पेरणारी कविता ‘ या शब्दात त्यांनी ताईच्या कवितेचा गौरव केलेला आहे.पुनश्च मी प्रतिभा ताईचे मनपुर्वक अभिनंदन करतो.” वंशावळीच्या प्राचीन सरीतून ” या कवितासंग्रहासाठी त्यांना शुभेच्छा देतो. या कवितासंग्रहातील कविता वाचून स्त्रीच दुःख,वेदना आपण जरी समजू शकलो तरी कवयित्री चे श्रम सार्थकी लागतील.त्यांच्या पुढील सुखीसमृद्ध आयुष्यासाठी आणि लेखन कार्यासाठी त्यांना शुभेछा देतो आणि लेखनीस पुर्णविराम देतो.
समीक्षण —> राजू गरमडे,चंद्रपूर.
कवितासंग्रह —> वंशावळीच्या प्राचीन सरीतून…
कवयित्री —> प्रतिभा खैरनारप्रकाशक —>
परिस पब्लिकेशन,पुणे.
प्रथमावृत्ती —> १० एप्रिल २०२५
प्रस्तावना —> दुर्गेश सोनार,नवी मुंबई.
मुखपृष्ठ —> अरविंद शेलारपृष्ठ —> १११
मूल्य —> ₹ १८०/-
