
ओझर (प्रतिनिधी ) गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी ओझर महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पेर्धेसाठी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ताहराबाद या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नांदगाव या महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख, प्राध्यापक डॉ. सी. बी. निगळे हे विषय तज्ञ् म्हणून उपस्थित होते.आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान व स्पर्धेचे युग आहे मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत आहे बदलत्या काळाची पाऊले ओळखून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी यासाठी अश्या स्पर्धा महत्वाची भूमिका पार पडतात असे प्रतिपादन डॉ. व्ही. बी. कदम यांनी केले आविष्कार स्पर्धा उदघाट्न प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या उपक्रमातून सर्व गुणसंपन्न असे व्यक्तिमत्व नक्कीच तयार होण्यास मदत होते असेही ते पुढे म्हणाले. तसेच डॉ. सी. बी. निगळे यांनी अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो त्यांच्यामध्ये संघभावना वाढीस लागते, नवनवीन संकलपना उदयास येतात असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. डी. एस. बोराडे यांनी ग्रामीण संशोधनाचे राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवरील महत्व आपल्या मनोगतातून विशद केले. महाविद्यालय स्तरावरील आविष्कार स्पर्धेमध्ये एकूण ३५ संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले, त्यात एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी महाविद्यालयातील सर्व, प्राध्यापक प्राध्यपकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रम प्रसंगी कला शाखा प्रमुख प्रा. एस. के. आवारे, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. आशा कदम, डॉ. एम. डी. दुगजे, डॉ. एस. वाय. सरदार तसेच डॉ. सुनीता उफाडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे शैक्षणिक संशोधन समन्वयक डॉ. एम. पी. दुशिंग यांनी आपल्या प्रास्ताविकेत आविष्कार स्पर्धेचा हेतू, उद्दिष्ठे तसेच स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. शरद धट यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. डी. ढिकले यांनी केले; तर डॉ. बी. के. घोटेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
