
वृक्ष दिंडी काढून जनजागृती करताना ग्रामपंचायत पदाधिकारी,भजनी मंडळ,विद्यार्थी,आणि नागरिक आदी.(छाया: सोमनाथ तळेकर)
भालूर (वार्ताहर) येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामपंचायतीच्या वतीने १७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ १७ तारखेला विशेष ग्रामसभा घेऊन घेऊन करण्यात आला.यामध्ये नागरिकांनी या अभियानासाठी स्वेच्छेने सहभागी होत विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वांच्या सहभागाची ग्वाही दिली. १७ तारखेला सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपूर्ण महाराष्ट्रात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी भालूर ग्रामपंचायत कडून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मेरी पंचायत,पंचायत निर्णय,ग्राम संवाद हे ॲप प्रत्येक नागरिकाने आपापल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतले.त्यानंतर आज सकाळी ग्रामस्थ,भजनी मंडळ,विद्यार्थी यांनी गावातून वृक्ष दिंडी काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली.यावेळी सुशासन युक्त पंचायत,सक्षम पंचायत,जल समृद्ध,स्वच्छ व हरित गाव,मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण,गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण,उपजीविका विकास,सामाजिक न्याय,लोकसहभाग व श्रमदान याबात जनजागृती करण्यात आली.यावेळी सरपंच शालूबाई थेटे,गणपत निकम,रमेश निकम,गोरख महाराज लहिरे,देवचंद महाराज घोडके राजेंद्र मेंगळ,देविदास निकम व भजनी मंडळाचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
