
ओझर (वार्ताहर) भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात तालुकास्तरीय चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेमध्ये इ पाचवी ते दहावीतील ६०, तर निबंध स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. इ.पाचवी व सहावी गट क्र.३ चित्रकला स्पर्धेमध्ये आराध्या संदेश वेताळ, तर निबंध स्पर्धेत तनिष्का कैलास पगार या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

या विद्यार्थ्यांना कलाशिक्षिका मोनाली निकम वर्षा पाटील मोहन क्षीरसागर विषय समिती प्रमुख लता आहेर मंगल सावंत सरोज खालकर सीमा पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
