
मुळडोंगरी (प्रतिनिधी) आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 सप्टेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाने हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला व तेव्हापासून 14 सप्टेंबर हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे विद्यालयातही हिंदी दिवस साजरा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक मा.श्री एस. जी. राठोड साहेब, तसेच सचिव मा. श्री सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे एस. एस. मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला.इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी गायत्री आव्हाड व कुमारी दिशा मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. हिंदी दिनाचे महत्त्व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आपल्या भाषणाद्वारे पटवून दिले व हिंदी विषयाचे शिक्षक श्री दराडे सर यांनी हिंदी दिनाच्या निमित्ताने हिंदी भाषेची महत्त्वपूर्ण अशी माहिती विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करताना सांगितली. शेवटी कार्यक्रम हम सब का अभिमान है हिंदी, भारत की शान है हिंदी.या जयघोषात संपन्न झाला.
