
मुंबई ( रमाकांत नारायणे ) यंदाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमान पद हे साताऱ्याकडे असणार आहे. राज्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या साताऱ्याकडे यंदाचे यजमान पद आहे. सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. सन २००३ ते २००६ विश्वास पाटील हे रायगड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांच्या हाताखाली मी कार्यकारी अभियंता म्हणून ३ वर्षे एकत्र काम केले आहे. ते जसे उत्तम साहित्यिक आहेत तसेच उत्तम प्रशासकही होते. या कार्यकाळात त्यांच्या संभाजी आणि चंद्रमुखी या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या व खुप गाजल्या. मा. साहित्यिक विश्वास पाटील यांना मनःपूर्वक शुभेच्छा !विश्वास पाटील यांची साहित्यनिर्मितीविश्वास पाटील यांनी दर्जेदार लेखनाची साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये पानिपत, महानायक , झाडाझडती या कादंबरी लिहिल्या आहेत. त्याचबरोबर नॉट गॉन विथ द विंड, आंबी, लस्ट फॉर लालबाग, गांधी : गीता, पांगिरा, चंद्रमुखी अशी अनेक कादंबरी लेखन केले आहे. त्याचबरोबर कलला चौक हा कथासंग्रह, चलो दिल्ली हा अनुवादित संग्रह आणि रणांगण हे नाटक लिहिले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनामध्ये घर तयार केले. विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबऱ्यांची हिदी भाषांतरे देखील झाली आहेत. पानिपतला प्रियदर्शनी पुरस्कार, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार व कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारांसह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले. झाडाझडतीला १९९२चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
