
. नांदगाव (प्रतिनिधी ) – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर डी. आर. भोसले यांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर डी आर भोसले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना त्यांचे कार्य सामाजिक व शिक्षणाशी निगडित होते. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित

होऊन त्यांनी शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. कर्मवीर डी. आर. भोसले हे शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित असलेले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते हे सांगितले. याप्रसंगी उमेश पगार ,जगन्नाथ पाटील, अण्णासाहेब दुकळे, दत्तात्रय भिलोरे, भाऊसाहेब सोनवणे, सुनील सुपेकर, शरद सातपुते, नरेंद्र पाटील भाऊसाहेब रायते, राजेंद्र कदम, कैलास खैरनार, गणेश ढोणे ,वाळू बागुल, कपिल पवार, सुभाष शेळके ,गणेश देवकर सुनीता निकम ,गीतांजली मोरे ,सुवर्णा अहिरे, स्मिता केदारे उपस्थित होते.
