
नाशिक ( प्रतिनिधी ) येथील ॲड. प्रा. मिलिंद चिंधडे यांच्या “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 14 सप्टेंबर 2025 ला रविवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृह सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम महाजन, प्रा.हेरंब गोविलकर, प्रा. डॉ.दिलीप बेलगावकर तर अध्यक्षस्थानी प्रकाश पाठक असतील. वैशाली प्रकाशन प्रकाशित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष संपत आलेले असताना, पुस्तक प्रकाशन होत आहे, ही गोष्ट अत्यंत औचित्यपूर्ण आहे.
