
सिन्नर (बातमीदार) विजयनगर भागात नवीन कोर्टासमोर सिन्नर .. बारा गाव पिंपरी रस्त्यावर नगरपरिषदेचा उघडा चेंबर होता.त्यात पडून अपघात होण्याची शक्यता होती,तसेच त्यात पावसाचे पाणी त्याचबरोबर वाहून येणारी घाण,केरकचरा साचल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता होती. तो चेंबर बंदिस्त करावा व संभाव्य धोका टाळावा यासाठी सामाजिक कार्यकते श्यामसुंदर झळके यांनी सिन्नर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित कदम यांना निवेदन दिले होते,त्याला वृत्तपत्रातून प्रसिध्दी दिली,त्याची दखल घेत नगर परिषदेने ताबडतोब उघड्या चेंबरवर झाकण बसविले. झळके यांच्या पाठपुराव्याला यश आले.

नवीन कोर्टा समोरील पूर्वीचा नगरपरिषदेचा उघडा चेंबर
