
नायडोंगरी ( वार्ताहर )नांदगाव येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी भालाफेक, लांब उडी, तिहेरी उडी, रिले शर्यत या प्रकारात सहभाग घेतला होता. यामध्ये लोकनेते अँड विजय शिवराम आहेर हायस्कूल व जुनिअर कॉलेज नायडोंगरी विद्यालयाच्या मुलींनी उज्वल कामगिरी करत त्यांची जिल्हापातळीवर निवड झाली यामध्ये 1)कावेरी ज्ञानेश्वर गायकवाड 400मीटर (19 वर्ष गट )प्रथम 2)लावण्या सुभाष राठोड लांब उडी ((19 वर्षे गट ) 3)अश्विनी बापू शिरसाट (600 मीटर तृतीय 4)ज्ञानेश्वरी नंदकुमार आहेर भालाफेक प्रथम (17 वर्ष गट ) 5) रूपाली चव्हाण ट्रिपल जम्प द्वितीय क्रमांक 6) ज्ञानेश्वरी नंदकुमार आहेर ट्रिपल जम्प प्रथम क्रमांक 7) लावण्या राठोड ट्रिपल जंप द्वितीय क्रमांक 8) प्रतीक्षा आहेर ट्रिपल जम्प प्रथम क्रमांक 9)रूपाली रवींद्र कापसे (19 वर्ष गट ) भालाफेक प्रथम 4×400 रिले संघ द्वितीय क्रमांक ( 17 वर्ष )वयोगट 4×400 रिले संघ द्वितीय क्रमांक(19 वर्ष) यशस्वी स्पर्धेकांना क्रीडा शिक्षक श्री राजेंद्र मारणे यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व विजयी स्पर्धेकांचे संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. विलासराव विजय आहेर यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.पी. व्ही.आहेर, उपमुख्याध्यापक श्री. टी.ई.मवाळ पर्यवेक्षक श्री. पी. एन. सोनेज , संस्थेचे संचालक मुख्य लिपिक श्री बाळासाहेब भोसले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवकांनीही अभिनंदन केले.
