
पेठ, (प्रतिनिधी) मविप्र आश्रम शाळा येथे वीर बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव पंधरवडा निमित्ताने आयोजित करिअर गायडन्स अंतर्गत व्याख्यानमालेत म्हसगणं आश्रम शाळेतील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक श्री सुधाकर मोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री सुभाष दळवी होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्राध्यापक मोरे यांनी आपल्या व्याख्यानात इयत्ता बारावी नंतरच्या कला आणि विज्ञान शाखेतील ज्या वेगवेगळ्या संधी आहेत त्याबद्दल माहिती सांगितली.

शेवटी अंत हीच सुरुवात सांगून त्यांनी त्यांच्या व्याख्यानाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक गोरख दाते यांनी केले. अध्यक्षपदाचे अनुमोदन श्रीमती वैशाली गीते यांनी दिले. यावेळी मंचावर श्री संतोष जाधव, प्राध्यापक गोरखनाथ कोटमे, प्राध्यापक योगेश पवार, प्राध्यापक लक्ष्मण भुरभूडे , प्राध्यापक हिरामण भोये, कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक राकेश बच्छाव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री योगेश गोवर्धने, श्री समाधान अहिरे, श्री सहारे मामा आदींनी परिश्रम घेतले.

