
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२१ वा दिवस* विस्तार पावणे हेच जीवन होय, संकोच पावणे हाच मृत्यू होय. प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. माझी अगदी पक्की खात्री झाली आहे की कुणीही व्यक्ती वा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळे काढून जिवंत राहणे शक्य नाही; आणि मोठेपणाच्या, पावित्र्याच्या वा व्यवहारचातुर्याच्या खोट्या कल्पनांनी जेव्हा जेव्हा असा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा त्याचे घातक परिणाम अलग होणाऱ्यांना भोगावे लागले आहे. ज्या ज्या गोष्टींनी आपण सार्वभौमिक तत्त्वाशी एक होतो त्या त्या गोष्टी सद्गुण होत आणि ज्या ज्या गोष्टींनी आपण त्या तत्त्वापासून वेगळे होतो त्या त्या गोष्टी पाप होत. तुम्ही त्या ‘अनंता’चा एक अंश आहात. हेच तुमचे वास्तविक स्वरूप आहे. म्हणून तुम्ही तुमच्या बांधवांचे संरक्षक आहात. *स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर १६ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद प्रौष्ठपदी पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ ★ पितृपक्ष प्रारंभ, पौर्णिमा श्राद्ध
★ १७९१ पहिले क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचा जन्मदिन.
★ १८८२ प्राच्यविद्या पंडित, पुरातत्वज्ञ, समाजसेवक, कुशल धन्वंतरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्मदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
