
सिन्नर (प्रतिनिधी )छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे मालेजीराजे भोसले यांच्या ४३१ व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेस डाॅ.अरुण थोरात व डाॅ.आर.डी.जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला. महामित्र दत्ता वायचळे म्हणाल कीमालेजीराजे भोसले यांनी पुत्र प्राप्तीसाठी अहमदनगरमधील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी त्यांना दोन मुले झाले आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली.शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.शहाजीराजे आपल्या कारकिर्दित निझाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले तरी त्यान्ची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यानी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यान्चे स्वप्न त्यांचे पुत्र शिवाजी महाराष्ट्र यानी प्रत्यक्षात आणले. शहाजी राजे कर्नाटकासारख्या ठिकाणी १५ ते २० हजारांची फौज बाळगून होते. तेथील जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र लढत होते. तेथील प्रजा शहाजीराजांना आपला आधारस्तंभ मानत होती. शहाजीराजे व इतर सरदार बेदनूर प्रांताची मोहिम फत्ते करुन होदिगिरी गावी मुक्कामास आले असताना तेव्हा महाराज शिकारीसाठी बाहेर पडले असताना त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला आणि घोडा कोसळला. या घटनेत ते २३ जानेवारी १६६४ मध्ये मृत्युमुखी पडले.असे मत व्यक्त केले.यावेळी डाॅ.अरुण थोरात, डाॅ.आर.डी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रकाश माळी,कार्यक्रमाचे अध्यक्ष महामिञ दत्ता वायचळेप्रास्ताविक विजय मुठे,आभार राजेंद्र सातपुते या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, डाॅ.अरुण थोरात, डाॅ.आर. डी.जाधव, विजय मुठे,दत्ता भाऊ रोकडे,नामदेव कुटे,बाळासाहेब र्वॅध, राजेंद्र देशमुख प्रकाश माळी,पांडुरंग चकोर, राजेंद्र सातपुते,विजय सुपे,नितीन हंडोरे,किशोर चव्हाण शिवाजी काकडी,सुधाकर गोळेसर
