
येथील बोरस्ते विद्यालयाच्या शिक्षिका रंगपंचमी उत्सव साजरा करताना…
ओझर :दि.१९ (वार्ताहर) येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयाच्या शिक्षिकांनी रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने विविध रंगांची उधळण करत नाविन्यपूर्ण रंगपंचमी साजरी केली. जिजाऊंची प्रेरणा, शिवरायांचे विचार, संभाजी महाराजांचा पराक्रम, सावित्रीच्या त्याग, महात्मा फुलेंचे शिक्षण, बाबासाहेबांची प्रज्ञा शोध करूना, अण्णाभाऊंची शाहीरी, गाडगेबाबांची स्वच्छता, अब्दुल कलामांचे मिसाइल, ताराराणीचा पराक्रम, अहिल्याबाई होळकरांचा कारभार, विश्व कल्याणकारी प्रार्थना, माणसाला माणूस जोडण्याचा, माणसात देव शोधण्याचा संकल्प करून टिक्का लावत मोठ्या उत्साहात रंगपंचमी उत्सव साजरा केला. याप्रसंगी मोनाली निकम वर्षा पाटील शितल हांडोरे मेघा शेजवळ शितल आहेर राजश्री टरले योजना खैरनार वनिता अहिरे मनीषा मोगल वैशाली कातकाडे आदी सर्व शिक्षिका उत्सवात सहभागी झाल्या होत्या.

