
चांदवड तालुक्यातील कातरवाडी रापली वडगाव पंगु कातरणी तळेगाव रोहि व कातरणी वन विभाग परिसरातील वन्य प्राण्यांचे पानवटे वाढवावे* *सविस्तर बातमी अशी आहे की चांदवड तालुका कातरवाडी रापली व वडगाव पंगु परिसरातील वन* *विभागाचे परिक्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे या परिसरात हरीण, काळवीट, मोर , व कोल्हा तरस बिबट ससे सायाळ या प्रकारचे वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील पाण्याचे स्तोत्र कमी झाले असून या मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी *आपला जीव धोक्यात घालून मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते त्यामुळे मोकाट कुत्र्याच्या तावडीत सापडून बऱ्याच हरण् व मोरांना रेल्वे खाली कोरड्या विहिरीत पडून आपला जीव गमवावा लागतो म्हणून प्रशासनाला व वन विभागाला कळकळीची विनंती आपण या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव ,रापली,* *कातरवाडी ,तळेगाव रोही या वनविभागाच्या परिसरात त्वरित पानवट्याची व्यवस्था वाढ करून मुक्या प्राण्यांना जीवदान मिळेल अशी आशा व्यक्त करतो**या प्रकारची सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झाल्टे यांनी दिली

