
नांदगाव ( प्रज्ञानंद जाधव तालुका प्रतिनिधी)नांदगाव येथील रि.पा.ई जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की दिनांक 20/3/2025रोजी दुपारी 1 वाजता रि.पा.ई (आठवले) गटाच्या बैठकीचे आयोजन केले असुन त्यात पक्ष बांधणी,स्वराज्य संस्था निवडणुका,तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा, सुशोभीकरण तसेच विविध विषयांवर चर्चा करणार असुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहाण्याचे विनंती या प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.सविस्तर माहिती अशी की रिपाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या आदेशान्वये नासिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली व नांदगांव तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २० मार्च २०२५ वार गुरूवार रोजी दुपारी १:०० वाजता नांदगांव येथील संविधान चौक समोरील शासकीय विश्राम गृह या ठिकाणी नांदगांव तालुका रिपाई पक्षाचे वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांच्या कार्यक्रम सभेची तारीख निश्चित करणे तसेच पक्ष संघटना बांधणी करणे,येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पुर्व तयारी नियोजन आणि नांदगांव शहरातील परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा तसेच सुशोभिकरण करणे बाबत आणि तसेच नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे गाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करणे इत्यादी बाबत तातडीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीत नांदगांव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व तरूण युवकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक यांच्या तर्फे करण्यात आले आहे.अशी माहिती रिपाईचे देविदास (आण्णा) मोरे जिल्हा कार्यअध्यक्ष तसेच गंगादादा त्रिभुवन जिल्हा सचिव रिपाई (आठवले गट )यांच्या वतीने वृत्त माध्यमांशी पत्रक देऊन सांगण्यात आले आहे.
