
मुळडोंगरी (प्रतिनिधी) वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ|| निर्वीघ्नम कुरमे देव सर्व कार्येषु सर्वदा*आज पासून सुरू होणाऱ्या १४ विद्या आणि 16 कलमांचा अधिपती मांगल्याचं,आनंदाचं प्रतीक सुखकर्ता,दुखहर्ता गणरायाचे “श्री गणेश चतुर्थी” निमित्त सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे जल्लोषात आगमन झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष मा.श्री.एस.जी. राठोड साहेब, सचिव श्री सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस.एस.मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
