
! नांदगाव ( प्रतिनिधी ) शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदगावच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची संस्थेच्या अध्यक्ष संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन शालेय पोषण आहार समितीच्या विविध समस्याबाबाब चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी दादा भुसे यांनी देखील सकारात्मक निर्णय देत याबाबत मी सबंधित विभागाशी चर्चा करून राज्य सरकारच्या वतीने जे काही करता येईल ते करतो असे आश्वासन दिले यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व पुरुष यांना विविध प्रकारच्या समस्याना तोंड द्यावे लागते त्यांना अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे त्यांना किमान वेतन कायद्याच्या अंतर्गत वेतनवाढ करावी त्यांना शिपाई कम कुक या पदावर नियुक्ती करण्यात यावी दरवर्षी करारनामा न करता थेट ज्या दिवसापासुन काम करत आहेत त्या दिवसापासून नियुक्ती पत्र देण्यात यावे विमा संरक्षणासाठी विमा देण्यात यावा दिवाळी बोनस देण्यात यावा यासह इतर अनेक मागण्यांसाठी नांदगाव येथिल आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदगावच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची संस्थेच्या अध्यक्ष संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व हा केवळ आपल्या तालुका किंवा जिल्ह्यातील प्रश्न नसून संबंध राज्यातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे याबाबत मी मंत्रिमंडळात प्रश्न उपस्थित करून जेवढे शक्य होईल तेवढे करण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले यावेळी संस्थेच्या वतीने भुसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सचिव आशाबाई काकळीज,मनीषा भाबड, सरला मोढे, सुनीता कुलकर्णी, शैला भाबड,संजय जमधडे,वर्षा जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध मागण्यांसाठी दिले निवेदन आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदगावच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची संस्थेच्या अध्यक्ष संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन शालेय पोषण आहार समितीच्या विविध समस्याबाबाब चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी दादा भुसे यांनी देखील सकारात्मक निर्णय देत याबाबत मी सबंधित विभागाशी चर्चा करून राज्य सरकारच्या वतीने जे काही करता येईल ते करतो असे आश्वासन दिले यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व पुरुष यांना विविध प्रकारच्या समस्याना तोंड द्यावे लागते त्यांना अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे त्यांना किमान वेतन कायद्याच्या अंतर्गत वेतनवाढ करावी त्यांना शिपाई कम कुक या पदावर नियुक्ती करण्यात यावी दरवर्षी करारनामा न करता थेट ज्या दिवसापासुन काम करत आहेत त्या दिवसापासून नियुक्ती पत्र देण्यात यावे विमा संरक्षणासाठी विमा देण्यात यावा दिवाळी बोनस देण्यात यावा यासह इतर अनेक मागण्यांसाठी नांदगाव येथिल आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदगावच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची संस्थेच्या अध्यक्ष संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व हा केवळ आपल्या तालुका किंवा जिल्ह्यातील प्रश्न नसून संबंध राज्यातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे याबाबत मी मंत्रिमंडळात प्रश्न उपस्थित करून जेवढे शक्य होईल तेवढे करण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले यावेळी संस्थेच्या वतीने भुसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सचिव आशाबाई काकळीज,मनीषा भाबड, सरला मोढे, सुनीता कुलकर्णी, शैला भाबड,संजय जमधडे,वर्षा जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.
