
नाशिक रोड (प्रतिनिधी ) वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत एम.जी.रोड सरस्वती विद्यालय,नाशिक येथील इ.४ थीच्या विद्यार्थिंनींनी शाळा भेट उपक्रम साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थिनींनी कविता आणि बालगीतांवर ताल धरून सहभागी होत भरभरून आनंद लुटला…* दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत एम.जी.रोड सरस्वती विद्यालय,नाशिक येथील इ.४थीच्या विद्यार्थिंनींची शाळा भेट व आनंददायी शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून शाळाभेट घडवून आणली.

.मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.आनंदी ताई व जोशीताई यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विद्यार्थिंनींनी स्वागत व कथ्थक नृत्य सुंदर सादर केले.गव्हर्निंग कौन्सिल सदस्या सौ.भारती चंद्रात्रे मॅडम यांनी शाळेच्या संपूर्ण परिसरातील व शाळेतील विविध उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली.शाळेचे पर्यवेक्षक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व श्री सुहास सुरळीकर यांचे स्वागत व विशेष सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध कवी व गीतकार राजेंद्र सोमवंशी यांनी ” गीत नवे गाऊ ” या कार्यक्रमाच्या माध्यमातून *खारुताई खारुताई,काय तुझ्या शेपटीचा झुपकाबाई…*

तसेच आईची महती करणारी सुंदर कविता *माझी आई गोड आहे…* यावेळी बालगीते व कविता सादर केले.गायक व संगीतकार श्री. सुहास सुरळीकर यांनी यावेळी *टाळीवर टाळी घेऊन जा,माझ्याशी मैत्री करुन पहा…* तसेच *ये सांग ना आई,मला कळतच नाय…* तसेच क्रिकेटवर आधारित *डोक्यात आला मला एकच प्लॅन* *बनायचं मला आता सुपरमॅन..*अशी सुंदर बालगीते गोड आवाजात सादर करून विद्यार्थिनींना मंत्रमुग्ध केले प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मँडम यांनी उपस्थित विद्यार्थिंनींनीचे स्वागत व शाळेची माहिती सांगितली.तसेच सरस्वती विद्यालय शाळेच्या काही विद्यार्थिंनींनी उस्फुर्तपणे शाळेबद्दल सुंदर गीतातून मनोगत व्यक्त केले.जाँईट सेक्रेटरी सौ.संगिता चव्हाण मँडम यांनी प्रमुख पाहूण्यांचे परिचय सुत्रसंचालन तसेच सर्व शिक्षकांची माहिती सांगितली.आभार ग.कौ सदस्य श्री.कैलास बागुल यांनी मानले .या कार्यक्रमासाठी मा.मख्याध्यापिका सौ.सविता कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.फलकलेखन श्री नितीन सोनवणी सर यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी ,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे , अधिक्षिका सौ.मिना वाळुंजे यांनी शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनुराधा बस्ते ,पर्यवेक्षक श्री. राजेंद्र सोमवंशी सर,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री.कैलास बागुल ,सौ.भारती चंद्रात्रे ,जाँईट सेक्रेटरी सौ.संगिता चव्हाण , सरस्वती विद्यालयाच्या सौ.कविता ठाकरे, श्रीमती. गवांदे श्रीमती.जोशी आदि मान्यवर व विद्यार्थिनीं उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
