
नांदगाव -(प्रतिनिधी ) मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयाची वनभोजन सहल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे ,उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण ,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सहल प्रमुख अजित पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचनेनुसार सर्व सकाळी ८ वाजता विद्यार्थी विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित झाले. यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे वर्गानुसार हजेरी घेण्यात आली. नंतर एकेक विद्यार्थ्याला सहलीच्या ठरलेल्या ठिकाणाच्या दिशेने रवाना झाले. विद्यार्थ्यां बरोबर शिक्षकही चालू लागले. वनभोजन सहलीचे ठिकाण नांदगाव जवळ असलेल्या जतपुरा या रोडवर असलेल्या निसर्गरम्य असा टेकडीवर घेण्यात आले होते. ठीक ९ वाजून २० मिनिटांनी मुले ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. सहल म्हटली की, मुलांनी अगदी वेगवेगळ्या प्रकारची पदार्थ सोबत आणली होती त्या पदार्थांवर विद्यार्थ्यांनी ताव मारायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना खाण्यासाठी केळी देखील देण्यात आली.सोबत शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी देखील होते. विद्यार्थींनी आणलेला पदार्थ एक दुसऱ्याला देत होते व घेत होते.यामुळे मुलांमध्ये एकोप्याची भावना दिसून येत होती. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य, शालेय कविता ,नाटिका सादर केल्या. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक, शिक्षिका यांनी देखील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला.निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या की, निसर्गाचा सानिध्यात वनभोजन हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. विद्यार्थ्यांनी नेहमी निसर्गावर प्रेम केले पाहिजे. या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा वाढण्यासही मदत झाली. विद्यार्थी विद्यालयाच्या दिशेने ११ वाजता जाण्यास सुरुवात झाली व सुखरूप विद्यालयात पोहोचले. वनभोजन सहल यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
