
मनमाड -: ( प्रतिनिधी ) येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये शाडू /शेतातील मातीपासून गणपती बनविणे उपक्रम घेण्यात आला. आपण निसर्गाचे देणे लागतो त्यामुळे निसर्गची हानी होणार नाही, जल प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे घरजेचे आहे. शाळेच्या भव्य दिव्य, निसर्गरम्य सानिध्यात ही कार्यशाळा घेण्यात आली…

विदयार्थ्यांनी देखील दिलेल्या सुचनेप्रमाणे, दाखवलेल्या कृतिप्रमाणे विविध कल्पकतेचे गणपती आकार बनविले. व उद्या गणपती बाप्पा चे आगमन होणार याचा आनंद सर्व च विदयार्थ्यांचा चेहऱ्यावर दरवळत होता.शिक्षिका पुजा कातकाडे यांनी प्रात्यक्षिके करुन दाखविले. कार्यशाळेसाठी मुख्यध्यापिका पी. जी. धात्रक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

