
चांदवड ( प्रतिनिधी ) नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दहेगाव येथे ग्रामसेवक राहुल सुभाष ततार यांच्या आशीर्वादाने दहेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कमळाबाई बाळु पगारे यांचा मुलगा झेरॉक्स सरपंच गजानन बाळू पगारे हा मनमानी करू कारभार पाहत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन (मनोजभाई संसारे) चे युवक तालुकाध्यक्ष चांदवड सागर राजेंद्र बोरगे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की चांदवड तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. कमलाबाई भाऊ पगारे या त्या कार्यालयात येऊन कामकाज पहात नाही. मात्र त्यांचा मुलगा

गजानन बाळू पगारे हा दहेगाव ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपणच सरपंच आहोत अशा अंतर्भावात सरपंचाच्या खुर्चीवर बसून ग्रामस्थांशी संवाद साधतो. सदर प्रकार हा बेकायदेशीर असून शासनाने नुकतेच अशा झेरॉक्स सरपंच व सदस्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना देखील म्हणजे दहिगाव (म.) येथे ग्रामपंचायत सरपंचाचा मुलगा गजानन बाळू पगारे हा सरपंचाच्या अधिकारासारखा काम करीत असून तो आलेल्या अधिनियंतांशी देखील चांगले बोलत नाही.

ग्रामसेवकांकडे काही अर्ज दिले तर सरपंच सौ. कमळाबाई बाळू पगारे यांनी उत्तरे देण्याऐवजी हा झेरॉक्स सरपंच गजानन बाळू पगारे हा उत्तर देतो. ग्रामसेवक श्री राहुल सुभाष कथा झेरॉक्स सरपंच गजानन बाळू पगारे यांच्या संगनमताने दहेगाव (म.) ग्रामपंचायतचा मनमानी कारभार सुरू असून ग्रामपंचायत आर्थिक नीट केली जात आहे. दहेगाव गावात अत्यंत बोगस कामे होत असून यावर रक्षक घेतला तर सदर ग्रामसेवक व झेरॉक्स सरपंच गजानन पगारे हे उडवा उडवीची उत्तरे देऊन मनमानी कारभार करतात. शासनाने मूळ सरपंच यांनी ग्राम पंचायत कार्यालयातील कामकाज पाहणे बंधनकारक केले असताना देखील झेरॉक्स सरपंचास ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आलेली आहे. मात्र दहेगाव (म.) या ठिकाणी झेरॉक्स सरपंच गजानन पगारे हा ग्रामसेवक यांच्या मेहरबानीने कामकाज करत आहे. म्हणजेच या ठिकाणी कुत्र पीठ खातं असा कारभार सुरू असून यावर शासनाने चौकशी करून कार्यवाही करावी व ग्रामसेवक राहुल सुभाष ततार आणि झेरॉक्स सरपंच गजानन बाळू पगारे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे कामी योग्य ते आदेश द्यावेत अन्यथा या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार होत राहील. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना देखील पत्र व्यवहार केला असल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन (मनोजभाई संसारे) चे युवक तालुका अध्यक्ष चांदवड सागर राजेंद्र बोरगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
