
सोनांबे बातमीदार: पाटोळे (ता. सिन्नर) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १४ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक आणि पवित्र वातावरणात पसायदानाचे सामूहिक पठण व प्रतिमा पूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी यांची पालखीतून मिरवणूक. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्या शिकवणीचा प्रभाव आजही अप्रतिम आहे

. २०२५ मध्ये त्यांच्या ७५० व्या जयंतीसाठी राज्यभरात पसायदानाचे पठण एकाच वेळी प्रत्येक शाळेत राबविण्याचा शासनाचा उद्देश आहे. यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व शाळांना आदेश दिले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमात सिन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांच्या मागणीचे स्वागत करण्यात आले.

शालेय मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत पसायदानाचा अर्थ स्पष्ट केला आणि त्याचे महत्व सांगितले. त्यांनी म्हटले, “७५० वर्षांनंतर देखील पसायदानाच्या विचारांनी आपला ठसा दिला आहे.

हे शब्द आजही तितकेच शक्तिशाली आणि प्रेरणादायक आहेत.” कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनिता बर्वे, कैलास पवार, प्रतिभा बैरागी, अनिता दातीर, स्वाती खताळे, सुनीता भिसे यंनी योगदान दिले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यभरातील शाळांमध्ये पसायदानाचे पठण करणे, हे एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायक कार्य आहे, जे ज्ञानेश्वरीच्या गोड वाणीचा प्रसार करत राहील.

