
मनमाड( प्रतिनिधी) – 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने मनमाड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन 2005 पासून यंदा सलग 21 व्या वर्षी स्वातंत्र्ययुध्दात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांना तसेच देशासाठी प्राण अर्पण करणार्या शहीद सैनिकांना रक्तदानाने आदरांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाचा शिबीर संयोजक व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, माजी नगर अध्यक्ष गणेश धात्रक जिल्हा सरचिटणीस सचिन दराडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार,भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, जिल्हा चिटणीस एकनाथ बोडखे, नितीन परदेशी शहर सरचिटणीस आनंद काकडे माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, लियातक शेख ऍड सुधाकर मोरे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत नीलकंठ त्रिभुवन आदी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आला.

शिबीर संयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी गत 21 वर्षापासून अखंड भारत दिनाचे स्मरण व्हावे म्हणून सर्व ऐच्छिक रक्तदात्यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा यज्ञ सुरु ठेवला आहे कोरोना संकट काळात भाजपा मनमाड तर्फे कोविड रुग्णांन सह इतर सर्व रुग्णाना रक्ता संबंधित भरीव मदत झाली असल्याचे याप्रसंगी सांगितले या भाजपा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरचिटणीस आनंद काकडे यांनी केले. भाजपतर्फे 2005 पासून सलग या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. एकच तारीख, एकच ठिकाण, एकच संयोजक व एकच रक्तपेढी असे सलग दोन दशके पेक्षा जास्त म्हणजे 21 वर्ष पूर्ण होण्याचा हा विक्रम या रक्तदान शिबीराच्या संयोजनाने मनमाड भाजपा शहर मंडलाने केला आहे गेल्या 21 वर्षात सुमारे 1000 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या शिबीरात सहभाग नोंदवला आहे. यंदाही 30 ऐच्छिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून स्वातंत्र्यवीरांना या रक्तदान शिबीरात रक्तदानाने श्रध्दांजली वाहिली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमास ,

मनमाड बाजार समिती चे सभापती दीपक गोगड,,अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी,माजी नगर सेवक विजय मिश्रा, भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे ,अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा, भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दीपक पगारे,बुधण बाबा शेख ,सप्टेंश चौधरी, शहर चिटणीस केतन देवरे नितीन अहिरराव ,गणेश कासार ,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर,विध्यार्थी आघाडी अध्यक्ष सर्वेश जोशी डॉक्टर आघाडी चे भूषण शर्मा दिव्यांग आघाडी च्या सुनीता ताई वानखेडे, भाजपा चे तौसिफ़ तांबोळी,,संतोष भराडे सर राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे रमाकांत मंत्री,,शंकरराव सानप,राजेश पाटील , विजय माळवतकर, अनंता कुलकर्णी राजस काकडे, आदीं मान्यवरा सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व रक्तदाते याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या गौरव प्रमाणपत्र देवून रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. नाशिक येथील जनकल्याण रक्तकेंद्रा च्या वतीने प्रदीप देशमुख आणि त्यांच्या सहकार्या नी यांनी रक्तसंकलन केले. शिबीराचे संयोजन जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केले तर भाजपा मनमाड शहराध्यक्ष संदीप नरवडे सरचिटणीस आनंद काकडे,, दिपक पगारे, सुमेर मिसर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.
