
नांदगाव (. प्रतिनिधी )आज गुरुवार दि.14/08/ 2025 रोजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘तिरंगा रॅलीचे’ आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी नांदगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भदाणे साहेब मान्यवर म्हणून उपस्थित होते. सदर प्रसंगी नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने अंमली पदार्थ सेवन न करण्याबाबत जनजागृती करण्यात आली व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन विरोधी शपथ देण्यात आली.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक भदाणे साहेबांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सविस्तर रित्या समजावून सांगितले. व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते व वैयक्तिक आरोग्यावर व्यसनांचा दुरगामी परिणाम होतो म्हणून अंमली पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डी.एम.राठोड वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अहिरे सर, प्रा आटोळे सर,कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के. पवार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अंमली पदार्थ सेवन विरोधी शपथ वाचन व सूत्रसंचालन प्रा.बी.के.पवार व क्रीडा संचालक प्रा.गळदगे यांनी केले.

