
सिन्नर –(प्रतिनिधी ,) भारतीय स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाले. गेल्या तीन वर्षापासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलात देखील हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज वंदनाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, राष्ट्रध्वज प्रतिज्ञा व स्वातंत्र्यवीरांचा जयघोष करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव *”हर घर तिरंगा”* या उपक्रमांतर्गत दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेचे सभासद तथा महात्मा फुले संकुलाचे माजी विद्यार्थी *मा.श्री. विजय वरंदळ (महाराष्ट्र पोलीस, नाशिक)* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.नामदेव लोणारे, संकुलाचे प्राचार्य श्री.मधुकर देशमुख, महिला महाविद्यालय प्राचार्य प्रा.गोकुळ महाले, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. संगीता राजगुरू, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य प्रा.एकनाथ माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.नामदेव लोणारे यांनी आजचा हा दिवस आपल्या प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. “हर घर तिरंगा” या उपक्रमाद्वारे आपण आपल्या तिरंग्याचा सन्मान करत आहोत. हा झेंडा केवळ कापडाचा तुकडा नसून, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे, त्यागाचे आणि देशप्रेमाचे प्रतीक आहे. तसेच तुमच्यात भारताचे भविष्य दडलेले आहे. शिक्षण, प्रामाणिकपणा, मेहनत आणि देशभक्ती हीच तुमची खरी ओळख असावी. आपल्या देशाचा तिरंगा नेहमी उंच ठेवण्यासाठी आपण चांगले नागरिक बनणे आवश्यक आहे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनी कु.प्रणाली लोणारे हिने आपल्या मनोगतातून “स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही, त्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, एकता आणि देशभक्तीची जाणीव करून देतो. तिरंगा फडकताना आपल्याला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. आपण सर्वांनी हा अभिमान सदैव जपला पाहिजे.” असे सांगितले या कार्यक्रमाचे संचलन क्रीडा शिक्षक श्री.किरण मिठे व श्री.सागर नन्ने यांनी केले. तर उपस्थित सर्वांचे आभार संकुलाचे प्राचार्य श्री.मधुकर देशमुख यांनी मानले.
