
नांदगाव: दि. 13 ऑगस्ट 2025, बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, सटाणा यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अंतरशालेय वादविवाद स्पर्धेत नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल (सीबीएसई) ने उल्लेखनीय कामगिरी करत दुसरे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० शाळांनी सहभाग घेतला होता.जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल (CBSE), नांदगाव येथील विद्यार्थिनींनी या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये उत्साहपूर्वक व सक्रिय सहभाग नोंदवला

.1)कु.अन्वेषा उदय मेघावत ( इयत्ता नववी), २)कु आर्या ललित पगार (इयत्ता नववी)यांनी “ए. आय. वरदान आहे की धोका?” या विषयावर आपले विचार व्यक्त करत शाळेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेला ₹७१०० चे रोख बक्षीस, पारितोषिक व प्रमाणपत्र मिळाले.सहभागीं विद्यार्थिनींना स्कुलचे प्राचार्य श्री मणी चावला यांच्या प्रेरणेने इंग्रजी विषय शिक्षक नाईकवाडे सर यांच्या कुशल मार्गदर्शन मिळाले.सहभागी विद्यार्थिनींच्या प्रेरणादायी सादरीकरणामुळे शाळेचा गौरव आणि अभिमान वाढवला आहे!या गुणवंत विद्यार्थिनींना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सचिव विजय चोपडा,सहसचिव सौ.प्रमिलाताई कासलीवाल, सुशिलभाऊ कासलीवाल, जुगलकिशोरजी अग्रवाल, महेंद्र चांदीवाल ,रिखबचंद कासलीवाल, आणि स्कूलचे प्राचार्य मणी चावला,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले!
