
नाशिक-(प्रतिनिधी ) येथील ‘पंचवटी ललित कला मंडळ’ ही संस्था विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठी स्थापन झाली असून मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करून कलाकारांना अधिक सक्षम करण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने मंडळाने यावर्षी ‘भगवान परशुराम संकुल, राजमाता जिजाऊ क्रीडा नगरी,छात्रवीर छत्रपती संभाजी चौक, तरवालानगर, दिंडोरी रोड, पंचवटी’ येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी स्वलिखित काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा इयता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात घेतली जाणार आहे. दोन्ही गटातील स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन अशा क्रमांकाची रोख एक हजार ते दोनशे रुपयापर्यंतची बक्षीसे, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक दिली जाणार असून या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत आपली कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा व प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहित्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन ‘पंलकमं’ चे अध्यक्ष कवी अरुण इंगळे, सचिव कवी राज शेळके, प्रसिद्धिप्रामुख राजेंद्र उगले आदींनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गझलकार पालवे (8007397060), कवी पंकज गवळी (7588172361) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
