
ओझर (प्रतिनिधी):दि.१३ वार्ताहर येथील मविप्र समाजाचे माधवराव बोरस्ते विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते पूजन होऊन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर भाषणे केली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. शिक्षक मनोगत नरेंद्र डेरले यांनी व्यक्त केले. फलक रेखाटन मोनाली निकम यांनी केले. व्यासपीठावर क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड, आत्माराम शिंदे भाऊसाहेब रौंदळ मोहन क्षीरसागर हेमंत भट बाबासाहेब लभडे बाबासाहेब गायकवाड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
